मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांकडून विधानसभेत बारामती हत्येचा उल्लेख, म्हणाले “घाव मेरा गहरा, अगला नंबर तेरा..”

अजित पवारांकडून विधानसभेत बारामती हत्येचा उल्लेख, म्हणाले “घाव मेरा गहरा, अगला नंबर तेरा..”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 22, 2022 06:49 PM IST

AssemblySession: मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलांनी मुलीच्या वडिलांची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajitpawar) यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करत अल्पवयीन आरोपींना सोडून न देता त्यांच्यावर कठोर कारवाईची उपाययोजना करण्याची मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार

Ajit pawar in assembly session : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलांनी मुलीच्या वडिलांची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करत अल्पवयीन आरोपींना सोडून न देता त्यांच्यावर कठोर कारवाईची उपाययोजना करावी, जेणेकरून अशा घटना रोखल्या जाऊ शकतात. अल्पवयीन मुलांवर सोशल मीडियाचा खराब प्रभाव पडत आहे. यावेळी त्यांनी आरोपीने “घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”, असं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेऊन हत्या केल्याचं सांगितले. 

विधानसभेत अजित पवार (Ajit pawar) म्हणाले की, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली व त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ ऑगस्टला बारामतीत शशिकांत नानासाहेब कारंडे यांची अल्पवयीन मुलांनी हत्या केली. कारंडे मुलीला शाळेतून आणायला गेले असताना दोन तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची मुलीसमोरच हत्या केली. हे अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची मागणी पवार यांनी केली. 

पवार यांनी विधानसभेला सांगितले की, याच आरोपी अल्पवयीन मुलाने यापूर्वीही मुलीला त्रास दिला होता. तेव्हा तो १७ वर्षांखालील म्हणजेच अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन बाल न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानेही त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यावर मुलीचे वडील शशिकांत कारंडे यांनी या मुलाला असं करू नको म्हणून समजावलं. मात्र याच मुलाने नंतर कारंडे यांचा जीव घेतला. 

व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबूक इत्यादी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने समाजातील अल्पवयीन मुलांवर याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांनी देखील गुन्हा केला तर त्यांना बालगृहात पाठवणे किंवा सोडून देणे असं न करता कडक कारवाई करावी लागेल. अन्यथा याकडे दुर्लक्ष केल्यास समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल. याची प्रचिती बारामतीत आली आहे. तेव्हा सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी, असंही पवारांनी म्हटले.

WhatsApp channel