मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी सोडले मौन

Ajit Pawar : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी सोडले मौन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 06, 2024 09:26 AM IST

Ajit Pawar on Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. काही जण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील असे त्यांनी म्हटले होते. यावरून अजित पवार हे शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहत आहे अशी टीका अजित पवार यांच्यावर केली होती.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar

Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात जनतेला भावनिक साद घालत मते मागितली होती. यावेळी त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचावर टीका केली होती. 'शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल, मात्र कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरुन शरद पवार गटाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. अजित पवार हे शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. अखेर अजित पवार यांनी या प्रकरणी मौन सोडले असून माझ्या व्यक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे ते म्हणाले.

Shirur murder : जमिनीच्या वादातून भाऊ व चुलत्यानेच काढला काटा; घोडनदीपात्रातील 'त्या' मृतदेहाचे गुढ उकलले; तिघांना अटक

अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात चांगलीच जुंपली होती. आव्हाड यांनी टीका केल्यावर धनंजय मुंडे आणि मिटकरी यांनी पवार कुटुंबात भांडणे लावू नये असे म्हटले होते. दरम्यान, या वरुन वाद वाढत असल्याने अजित पवार यांनी ट्विट करून त्यांनी खुलासा केला आहे.

अजित पवार म्हणाले, काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?

अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत काल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आव्हाड महाळे की, अजित पवार हे काकाच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे हे कितपत योग्य आहे? अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहील असे आव्हाड म्हणाले.

WhatsApp channel