मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar On CM Shinde: बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंची बिनपाण्याने केली असती : अजित पवार

Ajit Pawar On CM Shinde: बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंची बिनपाण्याने केली असती : अजित पवार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 16, 2022 11:43 AM IST

Ajit Pawar On CM Shinde: दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार (फोटो - पीटीआय)

Ajit Pawar On CM Shinde: दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कुणाची सभा होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. शिंदे गट की उद्धव ठाकरे यापैकी शिवाजी पार्कवर सभेला कुणाला परवानगी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिंदे गटाकडून शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या दोन्ही ठिकाणी सभेसाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. बोचरी टीका करताना अजित पवार यांनी म्हटलं की, "बाळासाहेब असते तर शिंदे साहेबांची बिनपाण्याने केली असती."

अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाचा दाखला दिला. ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं की, आता माझं वय झालंय, इथून पुढे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे या शिवसेनेची जबाबदारी पुढे नेतील. मूळ शिवसेनेची माझा मुलगा उद्धव ठाकरे पुढे नेतील असं म्हटलं होतं. तिथे पुतण्यालाही बाजूला केलं."

बाळासाहेब ठाकरे आज हयात असायला पाहिजे होते. एकनाथ शिंदे साहेबाची बिनपाण्याने केली असती. काही ठेवलं नसतं असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या