मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : चंद्रकांतदादांचं शरद पवार यांच्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य लोकांना आवडलं नाही, अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar : चंद्रकांतदादांचं शरद पवार यांच्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य लोकांना आवडलं नाही, अजित पवार स्पष्टच बोलले

Jun 06, 2024 11:38 PM IST

Ajit pawar on Lok sabha Election Result : बारामतीकरांनी मला नेहमी साथ दिली. पण यावेळचे निकाल आश्चर्यकारक आहेत. मीच कुठेतरी कमी पडलो असेल, असे म्हणत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

लोकसभा निवडणुकीतील अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारली
लोकसभा निवडणुकीतील अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारली

आतापर्यंतच्य राजकीय प्रवासात बारामतीकरांनी मोलाची साथ दिली, पण यावेळच्या निकालाने मात्र मी आश्चर्यकारक झालो. या अपयशासाठी कोणाला दोष देणार नाही. अपयश माझ्यामुळे आले. मीच कुठे तरी कमी पडलो असल्याची जाहीर कबुली देत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य करत याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या नेत्यांनी काम चांगलं केलं पण मी कुठेतरी कमी पडलो. आमचा पारंपरिक मतदार मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेल्याने त्याचा फटका बसल्याचं अजित पवारांनी मान्य केलं.

लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर अनेक आमदार साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेती माहिती दिली.

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य लोकांना आवडलं नाही -

भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी बारामतीत येऊन शरद पवारांच्याबद्दल केलेलं वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नसल्याची कबुली अजित पवारांनी दिली. महायुतीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, आम्हाला बारामतीत शरद पवारांना हरवायचं आहे. त्यांना बारामतीमधून संपविणार. शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते.

या निवडणुकीत झालेल्या चुका येत्या काळात सुधारल्या जातील, दूर गेलेल्या घटकाला सोबत घेतलं जाईल असंही अजित पवारांनी सांगितलं.

लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागला. केंद्रात NDA चं सरकार सलग तिसऱ्यांदा येत आहे. मात्र अपेक्षेइतके खासदार निवडून आले नाहीत. आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्याला काही आमदार गैरहजर राहिले. त्यांची काही वैयक्तिक कारणं आहेत. मात्र त्याबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. आमचे विरोधक म्हणतात की बैठकीला न आलेले आमदार संपर्कात आहेत. मात्र तसं काही नाही. आमचे आमदार कुठेही सोडून जाणार नाहीत.

दरम्यान ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असं आमदारांनी एकमताने निर्धार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४