Baba Siddique : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baba Siddique : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ

Baba Siddique : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ

Updated Oct 12, 2024 10:38 PM IST

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात त्यांच्यावर गोळीबार झाला होता.

बाबा  सिद्दीकी
बाबा सिद्दीकी

baba Siddique : मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येत असून अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले.

एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा व वांदे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडल्याची माहिती आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

बाबा सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. 

बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत.

बाबा सिद्दिकी यांना १५दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसात केल्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र तरीही आज घात झाला. तीन पैकी दोन हल्लेखोरांनी पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता खेरवाडी जंक्शनच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावाची परिस्थिती आहे.

नेमकं काय घडलं? 

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच ही घटना घडली. निर्मल नगर भागात विजयादशमीनिमित्त फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. ३ ते ४ राऊंड फायर झाले. त्यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली.

या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात झाला होता. त्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहेत. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर