ncp ajit pawar candidate list : राज्यात विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वतापावरून तिढा कायम आहे. जागा जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतांना दोन्ही आघाड्या नेमक्या किती जागा लढणार आहेत याच चित्र स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, एकनाथ शिंदे, मनसे, उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी त्यांच्या एक किंवा दोन याद्या जाहीर केल्या आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिसरी यादी आज जाहीर केली असून यात चार उमेदवारांना संधी दिली आहे. दरम्यान, या यादीतही नवाब मलिक यांचे नाव वगळण्यात आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जारी करण्यात आली असून यात केवळ चार उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर फलटण मतदार संघातून सचिन पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. निफाड मतदार संघातून दिलीपकाका बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेर मतदार संघातून नीलेश लंके यांच्या पत्नी विरोधात काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पारनेर मतदारसंघासाठी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. निलेश लंके व त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी प्रचारा नारळ देखील फोडला आहे. महायुतीकडून येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून काशीनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली असून ते राणी लंके यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे येथे अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे येथील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे.
नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात देखील विद्यमान आमदार दिलीपकाका बनकर यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे. दिलीप बनकर हे या मतदार संघातून दुसऱ्यांना निवडणूक लढवणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज तिसरी यादी जाहीर केली. या यादीत केवळ चार जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या नावाला भाजपने विरोध केला होता. त्यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, अजित पवार काय करणार या कडे सर्वांचे लक्ष होते. नवाब मलिक हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. नवाब मलिक यांना दाऊदशी कनेक्शन व भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात अटक झाली होती. मात्र, त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला आहे. सुटकेनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली. नवाब मलिक हे सध्या अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार आहेत. हा मतदारसंघ ते आता मुलगी सना शेख हिच्यासाठी सोडणार आहेत. मलिक स्वत: अबू आसिम आझमी यांच्या विरोधात मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून लढणार आहेत. मात्र, पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली तरी त्यांची उमेदवारी अद्याप जाहिर झाली नसल्याने त्यांच्या बाबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या