मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : पार्थला चुकीचे म्हणणारे अजित पवार अट्टल गुन्हेगाराला भेटले! पिंपरीचा कुख्यात गुंड आसिफ दाढीने घेतली भेट

Ajit Pawar : पार्थला चुकीचे म्हणणारे अजित पवार अट्टल गुन्हेगाराला भेटले! पिंपरीचा कुख्यात गुंड आसिफ दाढीने घेतली भेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 05, 2024 01:39 PM IST

Ajit Pawar met with criminal asif dadhi : गजानन मारणे यांना भेटून पार्थने चुकी केली असे म्हणणारे अजित पवार यांनी खुद्द पिंपरी-चिंचवड येथील अट्टल गुन्हेगार असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीला भेट दिली. त्यांच्या भेटीचा फोटो पुढे आला असून तो व्हायरल होतो आहे.

Ajit Pawar met with criminal asif dadhi
Ajit Pawar met with criminal asif dadhi

Ajit Pawar met with criminal asif dadhi : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गुंड गजानन मारणे ह्याची त्याच्या घरी जाऊन भेट भेटली होती. यावेळी अजित पवार यांनी पार्थने चुकी केली असे म्हटले होते. आपल्या मुलाला चुकीचे म्हणणारे अजित पावर यांनी मात्र, खुद्द एका अट्टल गुन्हेगाराला भेट दिली आहे. पिंपरी-चिंचवड येथील अट्टल गुन्हेगार आसिफ शेख उर्फ दाढी याने गुरुवारी देवगिरि बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेत एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असल्याचे समजते.

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे कुख्यात गुंडासोबत; फोटो शेअर करून संजय राऊत म्हणाले…

काल रविवारी पुण्यातील अट्टल गुंड हेमंत दाभेकर यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या घटनेला काही तास होत नाही तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुंड आसिफ शेख उर्फ दाढी याच्याशी भेटीचा फोटो पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. असिफ दाढीवर हा मोठा गुंड आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी शस्त्रास्त्रांसह त्याला या पूर्वी अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्या भेटी दरम्यान, नेमकी चर्चा काय झाली ही माहिती समजू शकली नाही.

Nashik IT raid : नाशिकमध्ये ८ कंत्राटदारांवर आयकर विभागाचे छापे; अधिकाऱ्यांच्या हाती लागले कोट्यवधी रुपयांचे घबाड

आसिफ शेख उर्फ दाढीला १९८८मध्ये मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तो त्याचा पहिला गुन्हा होता. यानंतर त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले आणि त्याच्या गुन्ह्यांचा आलेख हा चढता राहिला आहे. २०२१ मध्ये त्याच्यावर ८ मोठे गुन्हे दाखल झालेत. संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करून हत्या, विनापरवाना शस्त्राचा वापर, जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारचे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. या पूर्वी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला २०११मध्ये त्याला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे.

श्रीकांत शिंदेवर खासदार संजय राऊतांची टीका

कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा सध्या जामिनावर बाहेर आहे. तर शरद मोहोळचा तो अत्यंत विश्वासू मानला जातो. दोघांच्या भेटीमुळे आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे. आत स्वत: अजित पवार हे एका गुंडाला भेटल्यावर त्यांच्यावरही टीका होत आहे.

WhatsApp channel