मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar in Baramati : अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद! म्हणाले,'मी आजपर्यंत...'

Ajit Pawar in Baramati : अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद! म्हणाले,'मी आजपर्यंत...'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 04, 2024 12:33 PM IST

Ajit Pawar in Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती येथे असून त्यांनी आज बारामतीकरांशी भावनिक संवाद साधला.

Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar in Baramati

Ajit Pawar in Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती येथे दौऱ्यावर असून त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधत त्यांना भावनिक साद घातली. अजित पवार म्हणाले, आज पर्यंत तुम्ही वरिष्ठांचे खूप ऐकले. मी तुम्हाला आज पर्यंत काही मागितले नाही. पण आज तुम्हाला मत मागतो. मी जो खासदारकीला उमेदवार देणार त्यासाठी मते मागणार असल्याची साद घातली. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या वयावर टीका करत हे आत कधी थांबणार माहीत नाही असा टोलाही लगावला.

Shahid Kapoor : शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू

सध्या लोकसभा निवडणुकीचे सूप वाजले आहे. या साठी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यावर बारामतीमतदार संघातून अजित पवार कुणाला उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असून येथे एका कार्यक्रमात त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घालत मत मागितली. अजित पवार म्हणाले, आज तुम्हाला मी काही मागणार आहे. आज पर्यंत तुम्ही फक्त वारिष्ठांचे ऐकत आला आहात. जर भविष्यात जर मी आपल्या विचाराचा खासदार दिला तर तो मान्य करा. तुम्ही मला मतदान करत आहे असे समजून त्या उमेदवाराला मते द्या. उद्या आपला खासदार निवडून आला की, मला मोदींना सांगता येईल की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे आता माझी कामे झाले पाहिजेत. तुमच्या अडीअडचणीला कोण मदत करतो याचा विचार करा, असेही पवार म्हणाले.

Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

पवार म्हणाले, येत्या काही दिवसांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आत तयारीला लागायला हवे. आत येत्या काळात अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहे. मी महायुतीचा उमेदवार मी लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे त्या उमेदवाराला मी उभा आहे असे समजून मतदान करा. तुम्हाला ही शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक केलं जाईल. काय माहिती ह्यांची कधी शेवटची निवडणूक कधी असणार आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला.

 

अजत पवार म्हणाले, कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो, उंबराचे झाड आले की काही जण दत्त जयंती करतात. पण पक्षाने फळ खाल्ले की त्याच्या विष्ठेतून नवीन झाड येते. सगळ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, असे पवार म्हणाले.

WhatsApp channel