Viral Video: राज्यात राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य लोकांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस उलटले तोच, बाबुराव चांदेरे यांनी आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली. यात विजय रौधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चांदोरे हे विजय रौधळ यांना दमदाटी करताना दिसत आहेत. त्यानंतर रौंदळ यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण प्रकार कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारांसमोर घडला.
धक्कादायक बाब म्हणजे चांदोरे यांनी एखाद्या नागरिकाला मारहाण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकांना मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात ते एका रिक्षाचालकाला मारहाण करताना दिसून आले.
संबंधित बातम्या