Wakad Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगर सेवकाने एका हॉटेलमध्ये बसून गंमतीत पिस्तुलातून गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. या प्रकरणी माजी नगरसेवका विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना वाकड येथील एका हॉटेलमध्ये घडली.
विनोद जयवंत नढे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर सचिन नढे असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या एकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे हे पिस्तूल वापरतात. याच पिस्तुलातून सचिन नढे याने भिंतीच्या दिशेने गोळी झाडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद नढे व त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे त्यांच्या काही मित्रांसोबत वाकड येथील राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर बसले होते. यावेळी सर्व जाण मद्यपान करत बसले होते. यावेळी विनोद नढेला त्यांच्या काकांचा फोन आला. यावेळी त्यांनी बाहेर का फिरतो ? असे म्हणत स्वत: ची काळजी घेत जा असा म्हटले. यावर विनोद नढे यांनी काकाला उत्तर देत माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे, असे सांगितले.
यावेळी समोर बसलेल्या चुलत भाऊ सचिन नढे याने गमतीत तुझ्या कडे खर्च पिस्तूल आहे, का? असे विचारले. यावेळी त्याने ते पिस्तूल घेऊन लोड केले. ऐवढेच नाही तर समोरील भिंतीवर बंदूक ताणून गोळी झाडली. ही गोळी हॉटेलमधील एका कपाटाला लागली. यावेळी या कपाटाच्या शेजारी काहीजण बसले होते. सुदैवाने त्यांना गोली लागली नाही. नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी सचिन नढे व विनोद नढे या दोघांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.