Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दांत उत्तर देत सस्पेन्स वाढवला; म्हणाले…-ajit pawar big statement on is he will go with sharad pawar again ncp crisis ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दांत उत्तर देत सस्पेन्स वाढवला; म्हणाले…

Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दांत उत्तर देत सस्पेन्स वाढवला; म्हणाले…

Aug 15, 2024 08:08 PM IST

Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का?असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. यावर आता अजित पवारांनाही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का?  अजित पवारांनी दिले उत्तर
शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का?  अजित पवारांनी दिले उत्तर

Ajit Pawar On Sharad Pawar : सुमारे एक वर्षापूर्वी म्हणजे २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्ताधारी गटात सामील झाले. त्यानंतर लोकसभेतील अपयशानंतर अजित पवारांनी विधानसभेची तयारी सुरू करत महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका आणि सभा घेत आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. त्यात दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी म्हटलं होतं की, ‘सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं आपली चूक होती. अजित पवारांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का?असा प्रश्न राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला होता की, अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?यावर पवार म्हणाले होते की, हा निर्णय माझ्या एकट्याचा नसेल. ज्यांनी संकट काळात साथ दिली, त्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करून याचा निर्णय घेतला जाईल. मात्र ही जर-तरची गोष्ट आहे.

अजित पवार  यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी दोन शब्दांत उत्तर देत यावर अधिक बोलणं टाळलं. अजित पवार यांनी ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलं. याचाच अर्थ अजित पवार यांना सध्या यावर काही भाष्य करायचं नाही. अजित पवार एकीकडे महायुतीसोबत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत, मात्र दुसरीकडे आपण शरद पवार यांच्याकडे परत जाणार नसल्याचे ठामपणे सांगत नाहीत. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणाले अजित पवार –

शरद पवार यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले‘नो कॉमेंट्स. मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मीअर्थसंकल्पात चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काम केलं. कोणत्या मतदारसंघात काय केलं याची माहिती लोकांना देत आहोत.

महायुतीत येण्याची संधी आम्हाला मिळाली तेव्हापासून प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात आम्ही काय-काय काम केलं? काय विकास केला? हे आम्ही जनतेला सांगण्याचं काम करत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला असं वाटतं की, जे काही थोडसं काम बाकी राहिलं असेल त्या कारणामुळे काही मतदार आमच्याबरोबर आला नाही. मात्र, आता आम्ही जनतेला आमच्या कामाबाबत समजून सांगण्याचं काम करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.