निमंत्रणाच्या वादानंतर बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, भेटीत नेमकं काय घडलं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निमंत्रणाच्या वादानंतर बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, भेटीत नेमकं काय घडलं?

निमंत्रणाच्या वादानंतर बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, भेटीत नेमकं काय घडलं?

Jan 11, 2025 07:52 PM IST

Baramati Politics : बारामतीच्या अंजनगावात केवी उपकेंद्र आणि राजे उमाजी नाईक यांच्या नावाने बनविलेल्या सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती.

बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर
बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवारांनी ४० आमदारांसह सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षासोबतच पवार कुटूंबातही फूट पडल्याचे दिसून येत होते. सुरुवातील सुप्रिया सुळे व अजित पवारांनी एकमेकांवर टीका करण्याचे टाळले होते. मात्र लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी एकमेकांवर निशाणा साधत राजकीय वैर दाखवले आहे. पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार व सुप्रिया सुळे कधीच एका मंचावर दिसल्या नव्हत्या. मात्र शनिवारी बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त हे भाऊ-बहीण एकाच मंचावर आले.

दोघे एका मंचावर आले मात्र त्यांनी बोलणे दूरच एकमेकांकडे पाहिलेही नाही. बहीण भावाच्या वितृष्टाची कार्यक्रमस्थळी तसेच बारामतीत चर्चा रंगली आहे.

बारामतीच्या अंजनगावात केवी उपकेंद्र आणि राजे उमाजी नाईक यांच्या नावाने बनविलेल्या सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. महावितरणच्या उपकेंद्र उद्घाटनाप्रसंगी दोन्ही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, सुप्रिया सुळे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा दिल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

अंजनगावातील कार्यक्रमात आधी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अजित पवार पोहोचले. महिलांनी औक्षण करून अजित पवारांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते महावितरणच्या सभागृहाचे उ‌द्घाटन पार पडलं.

अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत आलेल्या लोकांकडे पाहून त्यांना नमस्कार केला. केवी उपकेंद्र आणि सभागृहाचे उद्घाटन हा जवळपास अर्धा तास कार्यक्रम सुरू होता. मात्र या काळात बहीण भावाने एकदाही एकमेकांकडे पाहिले नाही. अजित पवार अधिकाऱ्यांच्याकडून उपकेंद्राबाबतची माहिती घेत होते काही सूचना करीत होते. भेटायला आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकत होते. मात्र त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या खासदार सुळे यांच्याशी मात्र बोलणे टाळले. एका प्रसंगी तर फोटोसाठी अगदी एकाच फ्रेममध्ये आल्यानंतरही बहीण-भावाने एकमेकांकडे बघणे टाळले.

सुप्रिया सुळे यांनी काय केले आहे ट्विट –

अंजनगाव ता. बारामती येथे‘कृषी धोरण २०२०’ अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन होतोय. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला काही वेळापूर्वी मिळाली. मी स्वतः या भागाची लोकप्रतिनिधी आहे. येथील जनतेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करते. त्यामुळे माझे दौरे आणि कार्यक्रम पुर्वनियोजित असतात.

तरीही महत्त्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन किमान २४ तासांपूर्वी जरी केले आणि मला तशी कल्पना दिली तर, माझ्या कार्यक्रमात तसा बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.'असं सुप्रिया सुळे यांनी लिखित तक्रार केली.यावेळी त्यांनी फडणवीसांनाही टॅग केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या