Video : मुंबई विमानतळावर खासगी विमानाला मोठा अपघात, ३ प्रवासी जखमी, वाहतूक बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video : मुंबई विमानतळावर खासगी विमानाला मोठा अपघात, ३ प्रवासी जखमी, वाहतूक बंद

Video : मुंबई विमानतळावर खासगी विमानाला मोठा अपघात, ३ प्रवासी जखमी, वाहतूक बंद

Updated Sep 14, 2023 06:52 PM IST

Mumbai Airport plane accident news : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाला भीषण अपघात झाला असून त्यात तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

Mumbai Airport Accident
Mumbai Airport Accident

Mumbai Airport plane accident : मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर एका खासगी विमानाला मोठा अपघात झाला आहे. यात ३ प्रवासी जखमी झाले आहेत. कमी दृश्यमानता व पावसामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर मुंबई विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. (Mumbai Airport closed for traffic)

विशाखपट्टणमहून हे विमान मुंबईत आलं होतं. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धावपट्टी क्रमांक २७ वर उतरत असताना हे विमान घसरले. अपघातग्रस्त विमानाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर होते. त्यातील तिघे अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त विमान (VSR Ventures Learjet 45 Aircraft VT-DBL) हे दिलीप बिल्डकॉन या इन्फ्रा कंपनीच्या मालकीचं आहे. नागरी उड्डाण महासंचालकांनी एक निवेदनाद्वारे अपघाताला दुजोरा देत सविस्तर माहिती दिली आहे.

अपघातानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं असून विमानतळ तूर्त वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण स्थितीची पाहणी केली जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुंबईत पावसाची संततधार

दहीहंडीच्या दिवशी जोरदार कोसळल्यानंतर दडी मारलेल्या पावसानं आज मुंबईत चांगलीच बॅटिंग केली. मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. सखल भागात पाणीही भरलं होतं. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर