pune porsche car accident : पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताबाबत रोज नव नवींन घटना उघडकीस येत आहेत. सध्या आरोपी मुलाची आईची फरार आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून त्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत बिल्डर विशाल अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याचा दावा केला होता. याची तक्रार कंपनीकडे केल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले आहे. त्यामुळे पुणे पोलिस आता या घटनेचा उलगडा करण्यासाठी एआय तंत्रज्ञाची मदत घेणार आहे. या द्वारे अपघाताची घटना कशी घडली याचे ग्राफिक्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या साठी कंपनीचे तंत्रज्ञ हे जर्मनीवरून येणार असल्याची माहिती आहे.
पुण्यात झालेल्या अपघात प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. मुलाचे आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हा अपघात पोर्शकारमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे झाला असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा युक्तिवाद नाकारला. यासाठी पुणे पोलिसांनी पोर्श कंपनीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना पुण्यात गाडीच्या तपासणीसाठी बोलावले होते. कर्मचाऱ्यांनी गाडीची पाहणी करून यात कोणताही दोष नसल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान, आता अपघातग्रस्त पोर्श कारची तपासणी करण्यासाठी आता जर्मनीवरून तंत्रज्ञ पुण्यात येणार आहे. यावरून अगरवाल यांच्या वकिलाने केलेला दावा खरा आहे की खोटा हे उलगडणार आहे.
हे तंत्रज्ञ अपघात कसा झाला याचा उलगडा करण्यासाठी एआय प्रणालीचा वापर करणार आहे. हा अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग किती होता, कारचे किती वेळ हार्ड ब्रेकिंग करण्यात आले याची माहिती घेऊन ही माहिती आरटीओला दिला जाणार आहे. कारमध्ये असलेल्या इनबील्ट डॅशकॅमचे रेकॉर्डिंग देखील मिळाले असून अपघात झाला तेव्हा गाडीत नेमके काय काय झाले याची सर्व माहिती पुढे येणार आहे.
संबंधित बातम्या