ahmednagar rape : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातिल एका गावात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर महिन्याभरपासून अत्याचार करणे सुरूच ठेवले होते. दरम्यान, हा व्हिडिओ मुलींच्या नातेवाइकांनी पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार आणि युवराज नंदू शेंडगे असे आरोपींची नावे असून त्यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले १४ मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेय माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावात हा प्रकार घडला. एक नऊ वर्षांच्या मुलीला आरोपींनी धमकावत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी बनवला. या नंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल महिन्या भरपासून आरोपी मुलीवर अत्याचार करत होते. दरम्यान, हा व्हिडिओ मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहचला. त्यावेळी त्यांना ही बाब लक्षात आली.
या व्हिडिओ बाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी थेट पोलिस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.