मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pravara River : प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू, २ दिवसात ८ जणांना गमावला जीव

Pravara River : प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू, २ दिवसात ८ जणांना गमावला जीव

May 24, 2024 09:24 PM IST

Ahmednagar News : गुरुवारीSDRF च्या तीन जवानांसह १ नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याचीघटना ताजी असतानाच आज(शुक्रवार)पुन्हा या नदीमध्येदोन तरुणांचामृत्यू झाला आहे.

प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)
प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीमध्ये (Pravara River) दोन दिवसात ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी SDRF च्या तीन जवानांसह १ नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (शुक्रवार) पुन्हा या नदीमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर शहराजवळच्या प्रवरा नदीपात्रात ही घटना घडली. प्रवरा नदीत अपघाताचे सत्र सुरू असल्याने  एकच खळबळ उडाली आहे. आज बुडालेल्या तरुणांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य रामनाथ मोरे (१७ वर्षे) राहणार घुलेवाडी आणि श्रीपाद सुरेश काळे (१७ वर्षे) राहणार कोळवाडे असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र असून पोहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली. हे दोन्ही तरुण प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते.

बुधवारी दुपारी दोन तरुण प्रवरा नदीत बुडाले होते. त्यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला मात्र दुसऱ्याचा मृतदेह शोधताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटून तीन जवानांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात पुन्हा बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. प्रवरा नदीतून अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत.

प्रवरा नदीत SDRF च्या तीन जवानांना जलसमाधी -

बुधवारी (२२ मे) दुपारच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ वर्षे) आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले (वय२५ वर्षे) हे दोन तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात उतरले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, अर्जुन जेडगुले याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता.

दरम्यान गुरुवारी ( २३ मे) सकाळी धुळे येथून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांनी शोधकार्य सुरु करताच काळानं त्यांच्यावर घाला घातला व तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. SDRF च्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली. जीवाची बाजी लाऊन SDRF चे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करीत होते. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र तिघांना आपले प्राण गमवावे लागले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग