मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मोठ्या बिहिणीने केली छोट्या बहिणीची हत्या, कोपरगावात खळबळ

धक्कादायक.. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मोठ्या बिहिणीने केली छोट्या बहिणीची हत्या, कोपरगावात खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 11:32 PM IST

आपल्याप्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना माहिती दिलीतसेच प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी अडथळा आणल्याच्या रागातूनमोठ्या बहिणीने लहान बहिणीचीगळा दाबून हत्या केल्याचीधक्कादायक घटनाघडली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अहमदनगर – प्रेमासाठी लोक काय करतीय याचा नेम नाही. मात्र प्रेमात वेडी झालेले तरुण-तरुणी कधी-कधी आपल्या कुटूंबातील माणसांसाठीच धोकादायक ठरतात. अशीच एक घटना अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना माहिती दिली तसेच प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी अडथळा आणल्याच्या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणीला अटक करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे नंतर समोर आलं. मृत तरुणीच्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीनेचही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मोठ्या बहिणीचे श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणासोबत पळून जाणार असल्याची माहिती लहान बहिणीने घरच्यांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी मोठ्या बहिणीला समज देत तिचे कॉलेज काही दिवस बंद केले होते. याच रागातून तिने आपल्या लहान बहिणीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. बहिणीची हत्या करून आरोपी मोठी बहिण प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली. पोलिसांनीआरोपी बहीण आणि तिचा प्रियकर यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग