नगर हादरलं! दरोडेखोरांनी लघुशंकेला गेलेल्या पत्नीला घरात फरफटत आणलं, पतीला गळफास देऊन मारलं अन्..
Ahmednagarcrime : दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन पळ काढला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धाडसी दरोड्यात दरोडेखोरांनी एकाची हत्या करून सात लाखांची रोकड तसेच सोने -चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन पळ काढला आहे. दरोडेखोरांनी घरात घुसून एका तरुणाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली आहे. नईम पठाण (३३ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृताची पत्नी रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली असता घराबाहेर लपून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी घरात घुसून हे कांड केले. विशेष म्हणजे दरोडेखोरांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. दरोडेखोरांनी घरातील सात लाख रुपये आणि सोने-चांदीचा ऐवज लांबवला आहे.
पोलिसांनी सांगितले की, श्रीरामपूर शहरातील एकलहरे गावात हा दरोडा पडला आहे. अन्वर चिराग शेख यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आलाआहे. शेख यांच्या शेजारीच त्यांची मुलगी आणि जावई राहत होते. बुशरा यांनी रात्री फोन करुन वडिलांना सांगितले की आमच्याकडे चोर आले आहेत. फिर्यादींनी तिथे जाऊन पाहिले असता चोरट्यांनी बुशराच्या डोक्यावर बॅटरीने वारकेले होते. तसेच नईम पठाण मृतावस्थेत आढळून आले. नईम पठाणला साडीच्या सहाय्याने फाशी देण्यात आली होती. चोरट्यांनी बुशरा आणि नईम पठाणला मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपींनी सात लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
लघुशंकेला बाहेरआलेल्या महिलेला दरोडेखोरांनी फरफटत घरातआणले व मारहाण सुरू केली. पत्नीचाआरडाओरडाऐकून घरातदरोडेखोर आल्याचे नईमच्या लक्षात आले. मात्र काही कळायच्या आतच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळाच्या झोक्यासाठी बांधलेल्या ओढणीने गळफास दिला. दरोडेखोरांनी ओढणीने गळा आवळून नईमची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर शेती कामासाठी घरात आणलेली मोठी रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.
विभाग