Ahmednagar murder friend murder : मित्र म्हटलं की गंमत जंमत आलीच. एकमेकांची चेष्टा मस्करी देखील केली जाते. मात्र, हीच मस्करी एकाच्या जिवावर बेतली आहे. एका मेडिकलमध्ये दोघे जण एकमेकांची गमंत जंमत करत उभे होते. मात्र, या दरम्यान, चेष्टा सहन न झाल्याने मित्राने दुसऱ्या मित्रावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात मित्र गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील मुकुंदनगर परिसरात घडली.
जीशान खान असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. तर शमसुद्दीन खान असे चेष्टा सहन न झाल्याने जीशानची हत्या करणाऱ्या आरोपीचे मित्रांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. जखमी जिशान खान याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार जीशान आणि शमसुद्दीन हे दोघे एका मेडिकलमध्ये उभे होते. हे दोघेही चांगले मित्र असून त्यांची दुकानात असतांना चेष्टा मस्करी सुरू होती. यावेळी जीशानने केलेली चेष्टा मस्करी शमसुद्दीनला सहन झाली नाही. त्याने दुकानात असलेली कात्री घेऊन थेट जीशानवर हल्ला केला. यात जीशान हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे. आरोपी शमसुद्दीन हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस आरोपी शमसुद्दीन खानचा शोध घेत आहे.
दोन मित्रांमधील एकमेकांची मस्करी जीवावर बेतल्याने या घटनेची चर्चा शहरात सुरू होती. या बाबीचा गांभीर्याने विचार करणेही गरज नागरिक बोलून दाखवत आहे. अनेकदा समोरच्या व्यक्तीची सहन करण्याची क्षमता पाहून व त्याच्या संवेदनांना लक्षात घेऊन चेष्टा करावी, असा सुर नागरिकांमध्ये उठत आहे.
संबंधित बातम्या