मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

Jun 30, 2024 01:07 PM IST

Ahmednagar Crime : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी आमदाराला १ कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याने खळबळ उडाली आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

Ahmednagar Crime : अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत एका माजी आमदाराला तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जानेवारी ते 26 जून दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडली असून या प्रकरणी अहमदनगर येथील एका महिलेसह तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड व बांगर (पूर्ण नाव माहित नाही) या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर (रा. अहमदनगर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांनी तक्रार दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेचे वृत्त असे की, माजी आमदार भीमराव धोंडे यांना वरील तीन आरोपींनी फोन करत तुमचे अश्लील व्हिडिओ आमच्या जवळ आहेत. आम्ही ते सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमची राजकीय कारकीर्द बरबाद करू अशी धमकी दिली. तसेच अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. तसे होऊ द्यायचे नसेल तर एक एक कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, आरोपींनी २५ हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत.

या प्रकरणी आमदार धोंडे यांनी अहमदनगर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुंबईतील एका ४७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ऑर्गंडा अरविंद कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा कर्नाटकातील बेळगावचा आहे. त्याला शहरातील साकीनाका परिसरातील करिअर समुपदेशन केंद्रातून ताब्यात घेण्यात आले. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर