मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmadnagar: पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याआधी शेतकरी नेत्यांची धरपकड!

Ahmadnagar: पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याआधी शेतकरी नेत्यांची धरपकड!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2024 12:01 PM IST

Ahmadnagar: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

Police
Police (PTI)

PM Narendra Modi to visit Maharashtra: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाशिकला दाखल झाले आहेत.नाशिकमध्ये पंतप्रधानांचा रोडशो पाहायला मिळणार आहे. काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदावरीची महाआरती करतील. ज्यानंतर ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त तरुणांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी अकोले पोलिसांनी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले नोटीस पाठवली आहे.

अकोले पोलिसांनी अजित नवले यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसामध्ये म्हटले आहे की, दिनांक १२.०१. २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याचे नाशिक जिल्हा येथील दौऱ्याचे वेळी आपण तेथे जाऊन निदर्शन करणार आहेत, अशी आम्हास माहिती मिळली. तरी आपण नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या नाशिक येथे जाऊन निदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. याबाबत आपल्याकडून काही अनुचीत प्रकार घडल्यास आपल्यावर प्रचलीत कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, याकरीता आपणास प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात येत आहे.

नाशिक दौरा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. दुपारी ३.३० वाजता ते एमटीएचएलचे उद्घाटन करतील. या अटलसेतूवरुन प्रवास करीत नवी मुंबईतील सभास्थळी जातील. दुपारी ४.१५ वाजता नवी मुंबईतील सभास्थानी विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन, शुभारंभ, भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील. त्यानंतर मुंबई विमानतळावर येऊन सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला रवाना होतील.

WhatsApp channel