राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. पिक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विचार करा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांची जीभ घसरली.
सरकारच्या पिक विमा योजनेबद्दल सांगताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक रुपयात पिक विमा ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पिक विमा देत आहोतं असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.
कृषीमंत्री म्हणाले की, आम्गी एक रुपयात पिक विमा दिला. मात्र लोकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अन्य राज्यातील लोकांनी देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. आम्ही जेव्हा चौकशी केली त्यावेळी हे सत्य समोर आले. असे अनेक अर्ज नामंजूर केल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. पिक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे योग्य त्या शेतकऱ्याला ती योजना मिळाली पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे कोकाटे म्हणाले.
ही योजना बंद होणार का, यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, सरकारला पिक विमा योजना बंद करायची नाही. परंतु या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागणार आहेत. मात्र पिक विमा योजना ही बंद होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.
अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही. एक वेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात विमा देता येणार नाही हे देखील माणिकराव कोकाटे असेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या