मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agniveer Bharti : राज्यातल्या पहिल्या अग्निवीर भरतीसाठी औरंगाबाद सज्ज; शनिवारपासून प्रक्रिया होणार सुरू

Agniveer Bharti : राज्यातल्या पहिल्या अग्निवीर भरतीसाठी औरंगाबाद सज्ज; शनिवारपासून प्रक्रिया होणार सुरू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 11, 2022 05:33 PM IST

Indian Army Agniveer Bharti Rally 2022 : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे राज्यातील पहिली अग्निवीर भरती प्रक्रियेला औरंगाबाद येथून शनिवार पासून (दि १३) सुरुवात होत आहे. पुढील चार महीने ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Agniveers
Agniveers (HT_PRINT)

पुणे : बहुचर्चित अग्निवीर भरती योजनेला शनिवार पासून सुरुवात होत आहे. येथील रिक्रूटमेंट विभागाअंतर्गत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. शनिवार (दि १३) पासून राज्यातील ही पहिली  भरती प्रक्रिया औरंगाबाद येथे राबविली जाणार आहे. या साठी सर्व प्रकरची तयारी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या रिक्रूटमेंट विभागातर्फे करण्यात आली आहे.

पुढील चार महिन्यांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा, दमण, दीव आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अग्निवीर महिला मिलिटरी पोलिसांच्या रॅलीसह एकूण आठ भरती रॅली आयोजित केल्या जाणार आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी विविध श्रेणींसाठी नोंदणी केली आहे. अग्निपथ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, असे नोंदणी केलेल्या मुलांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पहिली रॅली ही  औरंगाबाद शनिवार पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा या रॅलीत समावेश राहणार आहे. रॅलीसाठीचे प्रवेशपत्र आर्मी रिक्रूटिंग ऑफिस औरंगाबाद मार्फत जारी करण्यात आले असून उमेदवार त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून ते डाउनलोड करू शकतात. कोणत्याही माहितीसाठी उमेदवार www.joinindianarmy.nic.in वापरू शकतात.

एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांच्या व्यवस्थापनासाठी, अनेक लष्करी आणि नागरी प्रशासकीय संस्थांमध्ये सूक्ष्म नियोजन आणि समन्वय साधन्यात आला आहे. उमेदवारांना समान आणि वाजवी संधी देण्यासाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबविली जाणार आहे.

WhatsApp channel