मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agnipath Scheme: वायुदलात भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या कुठे व कसा करायचा अर्ज

Agnipath Scheme: वायुदलात भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या कुठे व कसा करायचा अर्ज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 26, 2022 05:11 PM IST

Agnipath Scheme:भारतीयवायुसेनेतअग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज करण्याचीप्रक्रिया२४जून, २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२२ आहे.

अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू
अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू

Agnipath Scheme: अग्निपथ योजनेच्या माध्यमातून वायुसेनेत अग्निवीरांची मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू झाली आहे. या पदाला वायुसेनेने अग्निवीर वायु नाव दिले आहे. वायुसेनेत ही अग्निपथ योजनेच्या माध्यमातून पहिली भरती प्रक्रिया आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. जे इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रिया सामील होणार असतील त्यांनी वायुसेनेची अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in वर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल. तर जाणून घेऊया या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती..


वायुसेनेत अग्निवीर होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ जून २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. ५ जुलै २०२२ पर्यंत तरुणांना अग्निवीर पदासाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीची देशभर चर्चा झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींपासून वाचण्यासाठी अंतिम मुदतीच्या आधी उमेदवारांनी अर्ज सादर करावा.

जाणून घ्या महत्वाच्या तारखा -

  • अधिसूचना प्रसिद्ध होण्याची तारीख -२०जून,२०२२
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख-२४ जून, २०२२
  • अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख - ५ जुलै २०२२
  • परीक्षेची तारीख-२४ जुलै २०२२ पासून सुरू
  • निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तारीख - १ डिसेंबर, २०२२
  • इनरोलमेंट दिनांक -११ डिसेंबर २०२२

 

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा -

वायुसेनेत अग्निवीर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म २९ डिसेंबर १९९९ आणि २९ जून, २००५ दरम्यान झालेला असावा. भरतीसाठी अर्जाचे शुल्क २५० रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता विज्ञान व नॉन सायन्स स्ट्रीमसाठी वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता व अन्य आवश्यक नियम व अटींबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वायुदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अग्निवीर निवडण्याची प्रक्रिया -

  • ऑनलाइन टेस्ट.
  • शारीरिक आरोग्य परीक्षण (PFT)
  • मेडिकल टेस्ट.
  • अंतिम निवड यादी –१ डिसेंबर २०२२
  • इनरोलमेंट-११डिसेंबर २०२२

 

कसा करणार अर्ज?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइटcareerindianairforce.cdac.in वर जा.
  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. त्यावर दिसणाऱ्याAgniveer Vayuया सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यानंतर विचारण्यात आलेली वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा.
  • आता आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • त्यानंतर सर्व माहिती व कागदपत्रांसोबत संपूर्ण अर्ज भरा.
  • परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज सबमिट करा.
  • पुढच्या प्रक्रियेसाठी जमा केलेला अर्जाची प्रत डाउनलोडक करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

IPL_Entry_Point