EC investigated Niitin Gadkari Helicopter : उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस तपासल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने भाजपनेते व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. गडकरी हे मंगळवारी लातूरमध्ये प्रचारासाठी आले होते यावेळी ही तपासणी केली गेली . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग दोनदा तपासण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस तपासल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मीच पहिला गिऱ्हाईक कसा, मोदी आणि शाह यांच्याही बॅग तपासा, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. माझ्या बॅगा तुझ्याकडेच देतो, फक्त त्यातील कपडे चोरू नको, असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेल्या बॅगची लातूरमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासणे हा नेहमीच्या तपासाचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. ठाकरे यांची बॅग दोनदा तपासल्याने वाद निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना त्रास देण्यासाठी केलेली ही कारवाई असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आदर्श आचारसंहितेनुसार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू किंवा रोख रकमेचे वाटप रोखण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून नियमितपणे तपासणी केली जाते. उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी यवतमाळमध्ये उतरल्यानंतर प्रथमच त्यांची बॅग तपासण्यात आली. दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये त्यांच्या सामानाची पुन्हा तपासणी करण्यात आली. ठाकरे एका सभेसाठी हेलिकॉप्टरने लातूरला पोहोचले होते. माजी आमदार दिनकर माने यांच्या समर्थनार्थ त्यांनी येथे सभा घेतली होती.
शिवसेनेने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये निवडणूक अधिकारी पुन्हा पुन्हा बॅग तपासण्याची काय गरज आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे अधिकाऱ्यांना त्यांची नावे, पद विचारताना दिसत आहे. तसेच ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना आतापर्यंत तुम्ही किती लोकांची तपासणी केली असा प्रश्न देखील विचारला आहे.
यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, मी पहिली व्यक्ती आहे, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, "मी नेहमीच पहिला ग्राहक का बनतो?" निवडणूक आयोग महाराष्ट्रात सभांसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगेत तपासतात का? असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्याकडे लपवण्यासारखं काही नसेल तर ते चौकशीला विरोध का करत आहेत, असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्यमंत्र्यांकडे लपवण्यासारखे काहीच नसेल तर ते चौकशीला विरोध का करत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घटना म्हणजे निवडणुकीपूर्वी विरोधकांना त्रास देण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग आपलं काम करतो, आमची हरकत नाही. परंतु, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी २५ कोटी पाठवले आहेत. निवडणूक आयोग महायुतीच्या नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरचीही तपासणी का करत नाही याचं उत्तर त्यांनी द्याव? महायुतीच्या नेत्यांच्या बॅगेत फक्त अंडरवेअर आहे का? असा खोचक टोला देखील त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लगावला.