मराठी बातम्या  /  Maharashtra  /  After Tej Pratap Education Minister Now Threatens Said Bageshwar Baba Condition Will Be Like Advani Dirty Work Is Not Al

bageshwar baba : बागेश्वर बाबा घाणेरडं काम करतो, अडवाणीसारखी गत होणार; तेज प्रतापनंतर आता शिक्षणमंत्र्यांची धमकी

बागेश्वर बाबा
बागेश्वर बाबा
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
May 03, 2023 10:14 AM IST

bageshwar baba : बिहारमध्ये बागेश्वर बाबावरून मोठा वाद सुरू आहे. शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी बागेश्वर बाबा यांना धमकावत घाणेरडे काम केले तर अडवाणी सारखे ते देखील तुरुंगात जातील असे म्हटले आहे.

पाटणा : बागेश्वर बाबा पंडिच धीरेंद्र शास्त्री यांच्या पाटण्याला जाण्यापूर्वीच बिहार सरकारचे मंत्री यांनी त्यांचा विरोध सुरू केला आहे. आरजेडी नेते आणि बिहारचे मंत्री तेज प्रताप यांच्यानंतर आता शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनीही बागेश्वरबाबा यांना अल्टिमेटम दिला आहे. बाबा बागेश्वर घाणेरडे काम करायला आले तर बिहार परवानगी देणार नाही, द्वेष पसरवायचा हेतु असेल तर डवाणीही तुरुंगात गेले आणि ते देखील तुरुंगात जातील असे ते म्हणाले. बागेश्वर बाबा असोत किंवा इतर बाबा असोत, त्यांच्याकडे काही जादू किंवा चमत्कार नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mangesh Satamkar: धक्कादायक ! उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

बागेश्वर बाबा कुठल्याना कुठल्या कारणांनी नेहमी चर्चेत असतात. बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन पाटणा येथे करण्यात आले होते. दरम्यान, तेज प्रताप यांनी त्यांना इशारा दिला होता. बागेश्वर बाबा जर इथे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करायला आले असतील तर त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाईल. जर ते हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी येणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू.

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत; सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्या प्रकरणी चौकशीचे आदेश

तेज प्रताप यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते बागेश्वर बाबाला बिहारमध्ये घाणेरडे काम करण्यास परवानगी देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान तेज प्रताप यांच्या नंतर आता शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनीही बागेश्वर बाबांना सल्ला दिला आहे. जर ते गलिच्छ काम करायला बिहारमध्ये येणार असेल तर त्यांना परवानगी मिळणार नाही. बागेश्वर बाबांमध्ये कोणतीही जादुई आणि चमत्कारी शक्ती नाही. ते धर्माच्या नावाखाली धंदा करत आहेत, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि महाआघाडीचे सहयोगी जीतनराम मांझी यांनीही धीरेंद्र शास्त्रींना विरोध केला होता आणि म्हटले होते की, ते भडकवायला आणि टाळ्या वाजवायला येत असतील तर आम्ही त्यांना विरोध करू.

बिहार सरकारवर बागेश्वर बाबा यांनी अनेक आरोप केले आहे. विशिष्ट धर्माला खूष करण्याचे काम बिहारमध्ये होत असल्याचे ते म्हणाले होते. बागेश्वर बाबा यांच्या पाटणा येथील गांधी मैदानावरील आयोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. यावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. १३ ते १७ मे दरम्यान बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आहे. ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून याची जय्यत तयारी पाटणा येथे करण्यात येत आहे.

बागेश्वर बाबांचा वादाचा इतिहास

पंडित धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज हे त्यांच्या दैवी दरबारात भक्तांची म्हणणे ऐकतात आणि त्यांच्या चिंता दूर करतात असा दावा केला जातो. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेल्या अनेक व्यक्तव्यावरून ते वादात सापडले होते. यानंतर मी चमत्कारी माणूस नाही. मी फक्त हनुमानाचा भक्त असून सनातन धर्माचा प्रचार करतो, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, पाटणा येथील त्यांच्या कार्यक्रमामुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे.

WhatsApp channel

विभाग