CNG pump band in pune today : पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रानुसार सीएनजीच्या ट्रेड डिलर्ल मार्जिनमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यातील पेट्रोल डिलर्स असोसिएशननं संपाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळं आज पुण्यातील सर्व पेट्रोलपंपावरील सीएनजीची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्यानं पुण्यात त्याचा फटका लाखो वाहनचालक आणि प्रवाशांना बसणार आहे.
पुण्यात ६० पेक्षा जास्त पेट्रोलपंपावर सीएनजीची विक्री करण्यासाठीची सविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळं पीएमपीएलच्या बसेससह अनेक रिक्षा आणि कालचालक वाहनांमध्ये सीएनजी भरत असतात. परंतु आता पेट्रोल डिलर्स असोसिएननं पुकारलेल्या बंदनंतर आज पुण्यात कोणत्याही पेट्रोलपंपावर सीएनजीची विक्री होणार नसल्यानं त्याचा शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
पुण्यात लाखो रिक्षाचालक आणि कारचालक सीएनजीचा वापर करून प्रवाशांची वाहतूक करत असतात. त्यामुळं आज सीएनजीची विक्री बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. याशिवाय महापालिकेच्या असंख्य पीएमपी बसेससही सीएनजीवर चालतात. त्यामुळं आज पुण्यातील प्रवाशांना प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या