मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसचीही धाकधुक वाढली; पाच आमदार नॉट रिचेबल

काँग्रेसचीही धाकधुक वाढली; पाच आमदार नॉट रिचेबल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 21, 2022 05:08 PM IST

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. त्यात दुसरीकडे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेस पक्षातही काही नाराज असल्याचे सांगितले होते. दरम्यान काँग्रेसचे ५ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.

पाच आमदार नॉट रिचेबल
पाच आमदार नॉट रिचेबल (HT_PRINT)

Maharashtra political crises शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जवळपास २० आमदारांनी बंडाळी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदाराप्रमाणे आता काँग्रेसचे ५ आमदार (congress MLA) हे नॉट रिचेबल (Not Reachable) असल्याची माहिती मिळत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीमुळे त्यांना फटका बसला. यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देतांना म्हणाले होते की आमच्याच पक्षात नाराजी आहे. त्यामुळे आम्ही दुस-यावर बोट ठेऊ शकत नाही. जे बिघडले आहे ते पाहावे लागेल असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान शिवसेनेतील बंडाळीमुळे काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. मात्र, यातील ५ आमदार हे नॉट रिचेबल होते. काँग्रेसचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात याच्या संपर्कात आहे. त्यामुळे या बातम्या चुकीच्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने या संदर्भात व्टिट करत माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत.

काही आमदार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणा-या व असत्य आहेत. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजीमान्या संदर्भातील बातम्या चुकीच्या असून खोडसाळपणे पेरल्या जात आहेत. थोरात साहेब त्यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या