'महाराष्ट्र पेटला असताना...' बावनकुळेंच्या कसिनोमधील फोटोनंतर आता आदित्य ठाकरेंचा वादग्रस्त फोटो समोर
Chandrashekhar Bavankule Casino Photo : खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील फोटो शेअर केल्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून आदित्य ठाकरेंचा वादग्रस्त फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्यकरत त्यांचा एक फोटो ट्विट केला आहे. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र भाजपाकडून आदित्य ठाकरेंचा एक वादग्रस्त फोटो ट्विट करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोत जुगार खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कथित फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो १९ नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. १९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, वेनेशाइन येथला फोटो असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
चंद्रकांत बावनकुळे यांनी साधारण ३.५० कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात, असे राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत .. खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे संजय राऊतच्या यांच्या ट्विटर बॉम्बनंतर भाजप महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंचा कथित फोटो शेअर करण्यात आला आहे.
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? 'असे ट्विट'भाजपा महाराष्ट्र'कडून करण्यात आले आहे.