Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका ३६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी असून तो २१ जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची परकष्टा केली. मात्र, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुलेन बार्रे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सध्या जीबीएस बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. यातील ७३ जणांना रुग्णांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आले आहेत. यातील २० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून १५०० पेक्षा जास्त घराचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या ही १०० च्या वर गेली आहे. राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण हे ३० वयोगातील आहेत. तर काही रुग्ण हे २५ ते २९ वयोगटातील आहेत. तर, शून्य ते नऊ वयोगटातील २२ रुग्ण आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ला आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये पाण्यात कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता या जीवाणूच्या स्वरूपाचे जनुकीय अनुवांशिकतेद्वारे विश्लेषण केले जाणार आहे.
पुण्यात एका ५६ वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ही महिला ससुनमध्ये उपचार घेत होती. तिला इतर आजार देखील होते. तर सोलापुरात देखील आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या