Viral News : ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली व संपूर्ण मेकअप करून साडी नेसून एका विमानतळ अधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या या निर्णयाने सर्वच चक्रावून गेले आहे. या अधिकाऱ्याचा प्रेमविवाह झाला होता. तसेच त्याचा संसार देखील सुखानं सुरू असतांना त्यानं या अशा पद्धतीने टोकाचा निर्णय का घेतला ? या बाबत कुणालाच विश्वास बसला नाही. पोलिस या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास करत आहेत.
उत्तराखंडमधील उधमसिंगनगर जिल्ह्यातील पंतनगर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण पथकात कार्यरत असिस्टंट मॅनेजर आशिष चौंसाली यांनी रविवारी रात्री संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केली. शासकीय निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र, त्यापूर्वी आशीषने साडी नेसून, कपाळावर टिकली लावून मेकअपही केला होता. त्याने मृत्यूपूर्वी महिलेचा पोशाख का परिधान केला असावा या बाबत तर्फवितर्क लढवले जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. लैंगिक विकृती, ब्लॅकमेलिंग आणि ऑनलाइन फ्रॉड या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आशिष चौंसाली हा आनंदी आणि मनमिळावू व्यक्ती होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या सहकाऱ्यांपासून ते विमानतळावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आशिषच्या अशा वागण्याने चकित आणि दु:खी झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे विमानतळावर एकत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले असून नातेवाईक दु:खी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेने पोलीस कर्मचारीही चक्रावून गेले.
आशीषचे कुटुंब देखील सधन आणि संपन्न आहे. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. आशीषचे वडील खेमानंद हे चौनसाली पोलिस विभागात एसआय पदावर कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचं आजारपणामुळे निधन झालं. आशिषचा लहान भाऊ सनी दिल्ली मेट्रोमध्ये अधिकारी आहे. आशिषची आई व पत्नी पिथौरागढमध्ये शिक्षिका आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी आशिषने हळदवणीतील देवलचोड येथे घर बांधले होते. त्याची हल्दवणी येथे जमीन असल्याचेही समोर येत आहे. आशिषला एक मुलगी आहे. आशिषचे वैवाहिक जीवनही आनंदी होते. अशा परिस्थितीत आशिषने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
आशिष आणि आशाचे वैवाहिक जीवन आनंदी होते. दोघेही मुलीसह नैनिताल पंगुत येथे दोन दिवस फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे भावजय व कुटुंबही होते. तेव्हाही आशिष खूप खुश होता. कुठेही कसलाही तणाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. अशा स्थितीत त्यांनी अचानक केलेल्या आत्महत्येमुळे प्रश्न निर्माण झाला आहे.
आशिषचे वैवाहिक जीवन पूर्णपणे सामान्य आणि चांगले होते. आशिष आणि आशा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना सुमारे तीन वर्षांची मुलगी आहे. आकाशची पत्नी आशा पिथौरागढ येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षिका आहे. आईही शिक्षिका आणि वडील पोलिसात नोकरीला. चांगल्या कुटुंबातील असूनही आशिषच्या या विचित्र आत्महत्येच्या पाऊलाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आशिषने सहा वर्षांपूर्वी विमानतळ प्राधिकरणात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. यापूर्वी त्यांनी दिल्लीतही काम केले आहे. आशिषची पत्नी आणि आई पिथौरागढमध्ये राहतात. अशा परिस्थितीत त्यांनी पिथौरागढ विमानतळावर बदली करण्याची मागणी केली होती. व्यवस्थापनाने त्यांची विनंती मान्य केली. तो जुलैमध्ये पिथौरागढमध्ये रुजू होणार होता. तिथे त्याला नवी जबाबदारी मिळणार होती. यासाठी त्यांना डेहराडून आणि लखनौ येथे प्रशिक्षणही देण्यात आले. बदली झाल्याने आशिष देखील खूप खूश होता. मात्र, त्यापूर्वीच त्याने जीवन संपवले.
संबंधित बातम्या