मराठी बातम्या  /  Maharashtra  /   After Koyta Gang Now Spoofing Call Extortion Is Being Demanded Using The Mobile Number Of Eminent Persons

Pune Crime : पुण्यात फसवणुकीचा नवा फंडा; स्फुफींग कॉलद्वारे प्रतिष्ठित नागरिकांचे नाव वापरुन फसवणूक

Cyber crime (ht archives)
Cyber crime (ht archives) (HT_PRINT)
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Mar 28, 2023 01:18 PM IST

Pune Crime : पुण्यात नुकतेच मुरलीधर मोहोळ यांचा फोन हॅककरून एका बिल्डरची फसवणूक करण्यात आली होती. असे प्रकार पुण्यात वाढल्याची धक्कादायक माहिती आहे. स्फुफींग कॉलद्वारे प्रतिष्ठित नागरिकांचे नाव वापरुन फसवूक केली जात आहे.

पुणे : पुण्यात माजी महापौर यांचा फोन हॅक करून एका बिल्डरला ३ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा हा नवा प्रकार पुढे आला आहे. या माध्यमातून सायबर चोरटे थेट प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाइल क्रमांक वापरून इंटरनेटवरून स्पुफिंगद्वारे पैसे लुबाडत असल्याचे पुढे आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सायबर क्राइममध्ये स्पुफिंग कॉल हा नवीन प्रकार आहे. इंटरनेटचा वापर करून आयपी स्पुफिंग, ईमेल स्पुफिंग, वेबसाइट स्पुफिंग केले जात आहेत. यात कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन तेसच मेल करून पैशांची मागणी केली जाते. यामुळे असा काही फोन अथवा मेल आल्यास संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून खात्री करून घ्यावी.

या प्रकारामागे संदीप पाटील नामक व्यक्तीचा हात असून त्याला आणि त्याच्या एका सहकाऱ्याला पोलिसांनी १० लाख रुपये घेतांना अटक केली आहे. संदीप पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील असून तो पुण्यात राहतो. कोरोनाकाळात त्याची नोकरी गेली. त्याने १० टक्के व्याजाने कर्ज घेतले असून कर्जाचा डोंगर वाढत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी त्याने इंटरनेटवरून स्पुफिंग कॉल कसे करायचे याचे धडे घेत अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याने तब्बल ३० ते ४० प्रतिष्ठित लोकांचे मोबाइल नंबर मिळविले होते. या नंबरच्या साह्याने त्याने काही जणांना गंडवण्याचा प्रकार केला. मात्र, त्याला यश आले नाही.

संदीप पाटील हा मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एका बिल्डरची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे मोहोळ यांचे चांगले मित्र असल्याने ते अशाप्रकारे दुसऱ्याकडून आपल्याला सांगणार नाहीत, याची खात्री असल्याने त्यांनी स्वत: मोहोळ यांना फोन करून चौकशी केली. यावेळी या फसवणुकीचा उलगडा झाला. बिल्डरने फोनचे स्क्रीन शॉट मोहोळ यांना पाठविले. त्यानंतर मोहोळ यांनी पुन्हा फोन करून त्यांना आपण असे कॉल केले नसल्याचे सांगितले. दरम्यान, फोन वरून दोघांचे संभाषण सुरू असतांना फिर्यादीला मोहोळ यांच्या नावाने फोन येत असल्याचे कळले. हा प्रकार त्यांनी सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना सांगितल्यावर तपासची चक्रे फिरली आणि आरोपी संदीपला अटक करण्यात आली.