मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भगर खाल्ल्याने विषबाधा; सरकारने मागवले प्रत्येक जिल्ह्यातून १० नमुने

भगर खाल्ल्याने विषबाधा; सरकारने मागवले प्रत्येक जिल्ह्यातून १० नमुने

HT Marathi Desk HT Marathi
Sep 29, 2022 11:31 PM IST

उपवासाची भगर खाल्ल्याने विष बाधेच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भगर विक्री करणारे सर्व उत्पादक व विक्रेते यांच्याकडील नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

Food and Drug administration minister Sanjay Rathod
Food and Drug administration minister Sanjay Rathod

औरंगाबाद, जालना व बीड येथे उपवासाची भगर खाल्ल्याने विष बाधेच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात भगर विक्री करणारे सर्व उत्पादक व विक्रेते यांच्याकडील प्रत्येकी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर अहवाल सादर करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यात या सूचना देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अन्न व औषध तसेच सौंदर्य प्रसाधने यामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करण्याच्या सूचना संजय राठोड यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. औषध विभागातील सर्व कंपन्या जागतिक स्तरावरील तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात किंवा कसे याबाबत कार्यवाही करण्याचेही यावेळी निर्देश देण्यात आले. कॅन्सर, डायबिटीज यावरील औषध उत्पादक कंपन्या या त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना, कंपनीमधील औषधाचा दर्जा हा केंद्र शासनाने नेमून दिलेल्या संगणक प्रणाली प्रमाणे मशीनरीचा वापरतात काय हे तपासण्याच्या सूचना यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

अन्न विभागामध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश राठोड यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या अन्न उद्योगामधील उत्पादन प्रकरणात तपासणी करता येत नाही अशी अडचण अधिकाऱ्यांनी उपस्थित केली. अशा सर्व पदार्थांच्या वितरक व विक्रेते यांचेकडील नमुने कायदेशीर पद्धतीने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाने अलीकडे पारित केलेल्या अन्नपदार्थ, सर्व प्रकारचे पेये यामध्ये तपासण्या काटेकोर होतील याकडे विभागाने लक्ष देण्याचे निर्देश दिले.

प्रतिबंधित माल येणारे आंतरराज्य सिमा, टोल नाके, गोदाम याबाबत तपासणी करुन प्रतिबंधित मालाची वाहतूक करणारे मोठे व्यापारी, वाहतुकदार यांना शोधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या