पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात ८६ वर्षांच्या विक्रमही मोडला, एकाच दिवसात १३३ मीमी पावसाची नोंद-after dry september 133 mm rainfall in pune sets new record since 1896 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात ८६ वर्षांच्या विक्रमही मोडला, एकाच दिवसात १३३ मीमी पावसाची नोंद

पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात ८६ वर्षांच्या विक्रमही मोडला, एकाच दिवसात १३३ मीमी पावसाची नोंद

Sep 27, 2024 01:12 PM IST

Pune record break rainfall : पुण्यात बुधवारी तब्बल १३३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ८ दशकातील सर्वाधिक पावसाची नोंद एकाच दिवसांत झाली आहे. तर १८९६ नंतर बुधवारी एका दिवसांत १३३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात एकाच दिवसांत १३३ मीमी आजवरच्या सर्वाधिक पावसाची नोंद
पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात एकाच दिवसांत १३३ मीमी आजवरच्या सर्वाधिक पावसाची नोंद

Pune Record break rainfall : पुण्यात बुधवारी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली झाली. बुधवारी सकाळी ८.३० ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० या २४ तासांत १३३ मिमी पावसाची नोंद झाल्याने पुण्याने १८९६ नंतरचा सप्टेंबरचा पावसाचा नवा उच्चांक नोंदवला. मुसळधार पावसाने सप्टेंबरच्या मध्यापर्यंतच्या तुटवड्यातून २६ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस भरून काढल्याची माहिती पुणे वेध शाळेने दिली. एवढेच नाही तर या पूर्वी २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिमी पावसाची नोंद पुण्यात झाली होती. तर त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ रोजी ११५.३ मिमी, व १९ सप्टेंबर १९८३ रोजी ११०.७ मिमी पावसाची नोंद पुण्यात झाली होती.

पुणे शहर आणि जिल्हयात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. शहर आणि उपनगरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी (२६ सप्टेंबर) पावसाचा जोर कमी झाला. दुपारनंतर तुरळक सरी पडल्या. दिवसभरात शिवाजीनगरमध्ये फक्त चार मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शहरात १५ सप्टेंबरपर्यंत केवळ २१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मासिक सरासरी १४६.३ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ही पावसाची तूट आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने शहराने पावसाची सरासरी ओलांडली आणि सप्टेंबरमहिन्यातील तूट भरून काढली, शिवाय २४ तासात सर्वाधिक पावसाचा नवा ऐतिहासिक विक्रमही प्रस्थापित केला. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शहरात २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १९६.२ मिमी पाऊस झाला आहे. सामान्य पातळीच्या तुलनेत तब्बल ४९.९ मिमी पाऊस जास्त झळा आहे.

पुण्यातील मोसमी पाऊसही यावर्षी सामान्य पावसाच्या सारसरीच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात नोंदविला गेला. आयएमडीच्या आकडेवारीनुसार जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर (जेजेएएस) या कालावधीत पुणे शहरात सरासरी ६३८.२ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात शहरात सुमारे ११२१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा सुमारे ४०० मिलिमीटर अधिक आहे. २००८ नंतरचा हा सर्वाधिक मोसमी पाऊस होता. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस २०१९ मध्ये १०७१.९ मिमी इतका झाला होता.

२५ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर २६ सप्टेंबरला पुण्यात पावसाचा जोर कमी झाला. मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असूनही सायंकाळच्या वेळी शहरात हलक्या पावसाची नोंद झाली असून सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती आयएमडी पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली. त्यामुळे २७ सप्टेंबररोजी पुण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ३० सप्टेंबरपर्यंत शहरात पाऊस पडण्याची शक्यता नाही.

Whats_app_banner
विभाग