राज्यात चाललंय काय? बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शौचालयात नेऊन केला बलात्कार-after badlapur minor girl was raped in ambarnath nine year old girl rape in public toilet ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात चाललंय काय? बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शौचालयात नेऊन केला बलात्कार

राज्यात चाललंय काय? बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शौचालयात नेऊन केला बलात्कार

Aug 22, 2024 06:05 PM IST

Ambarnath Rape : अंबरनाथमध्ये राहणारी पीडिता सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच तसेच यावरून राज्यात संतापाची लाट उसळली असताना आता अंबरनाथमधूनही अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय आरोपीने ९ वर्षीच्या चिमुकलीवर अश्लील चित्रफीत दाखवून शौचालयात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला.अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे.

संतोष कांबळे असे आरोपीचे नाव आहे. अंबरनाथ (raped in Ambarnath) मध्ये राहणारी पीडिता सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने २१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली. अंबरनाथ पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कालस्कर यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दररम्यान,काही दिवसांपूर्वी बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलीवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला होहात. घटनेच्या तीन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली होती. सफाई कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी पीडितेच्या आईला १२ तास ताटकळत ठेवल्याचा तसेच शाळा प्रशासनानेही बदनामीच्या भीतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले होते. सध्या आरोपी अक्षय शिंदे न्यायालयीन कोठडीत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापुरातील नागरिकांना रेल्वे रोको आंदोलन करत ८ ते १० रेल्वे रोखून धरली. मंत्री गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं व रेल्वेमार्ग मोकळा केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु आहे. तसेच या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोल्हापुरात१० वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या–

कोल्हापुरातील शिये येथे एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. तिच्यावर लैंगिक अत्त्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात घडली आहे. १० वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीचा शेतात मृतदेह सापडल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंआहे. पीडित मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती.

विभाग