मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  UBT Press Conference : शिवसेनेबाबत राहुल नार्वेकरांचे निर्णय कसे चुकले? ॲड सरोदेंकडून सविस्तर स्पष्टीकरण

UBT Press Conference : शिवसेनेबाबत राहुल नार्वेकरांचे निर्णय कसे चुकले? ॲड सरोदेंकडून सविस्तर स्पष्टीकरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2024 06:38 PM IST

Uddhav Thackeray Press Conference : नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनीआज महापत्रकार परिषद घेत व्हिडिओ पुरावे जनतेसमोर सादर केले. या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी नार्वेकर यांच्या निर्णयांची चिरफाड करत अनेक मुद्दे मांडले.

Adv asim sarode
Adv asim sarode

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मोठा निकाल देताना शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देत भरत गोगवलेंचा व्हीप वैध असल्याचा निकाल दिला. यामुळे शिंदे गटातील सर्व आमदार पात्र ठरले आहेत. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेत व्हिडिओ पुरावे जनतेसमोर सादर केले. या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी नार्वेकर यांच्या निर्णयांची चिरफाड करत अनेक मुद्दे मांडले.

जर कोणाला राजकीय पक्ष सोडायचा असेल तर ते पक्ष सोडू शकतात, पण त्या आधारे ते अपात्र ठरतात. पक्षाच्या व्हिपचे त्यांना पालन करावे लागते. नसेल तर ते आमदार, खासदार अपात्र ठरू शकतो. मात्र कायद्याच्या दृष्टीकोनातून एकूण संख्येच्या दोन तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी लागू होत नाही. 

एकनाथ शिंदे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत फक्त १६ आमदार होते. नंतर त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं व अमिषे दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला, त्यांची फाईल तयार होती, त्यांना भीती दाखवली आणि काहीजण सुरतला जाऊन त्यांना मिळाले काहीजण गुवाहाटीला जाऊन मिळाले. नंतर ते मुंबईला आले आणि मुंबईत काही जण त्यांना जाऊन मिळाले. अशा पद्धतीने त्यांच्याकडे ३८ ते ४० आमदारांचे पाठबळ झाले आहे. 

असीम सरोदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 

 • नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. १० व्या परिशिष्ठाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे ५ न्यायाधीशांचे घटनापीठ बसते. परंतु हा पक्षांतर्गत वाद म्हणून नार्वेकर यांनी निकाल दिला. 
 • विधानसभा अध्यक्ष असाच निर्णय देणार असं लोक म्हणत होते. असाच निकाल येणार याची जनतेला जाणीव होती. ही परिस्थिती लोकशाहीसाठी चांगली नाही.
 • महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती होत मी बाहेर जायचं तेव्हा सांगितलं जायचं की तुम्ही कितीही पुरावे द्या उद्धव साहेबांवर अन्याय होणार
 • या निकालाने संविधानाच्या चिंधड्या उडवल्या आहेत. यामुळे वाईट प्रवृत्तीचं राजकारणात सरशी होताना दिसत आहे.
 • ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे त्यांना या परिस्थितीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
 • कोणी जर व्हीपचं पालन न करता बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. 
 • एकनाथ शिंदे आणि पळून गेलेले आमदार कोणत्याही पक्षात विलिन झालेले नाहीत ते कायम सांगतात आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळे ते अपात्र ठरतात.
 • एकनाथ शिंदेसह गेलेले दोन तृतीयांश संख्येने गेले मात्र पहिल्यांदा ते १६ जण बाहेर गेले. 
 • अध्यक्ष पद मिळाल्यावर राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावे लागतो.  मात्र नार्वेकरांनी अद्याप तो दिलेला नाही.
 • कोणताच कायदा असं म्हणत नाही की कायद्याचा वाटेल तो अर्थ काढा.
 • जसा कायदा सांगितलं आहे तसाच कायदा त्याचा काही अर्थ काढायचा नाही पण त्यातूनच काही कळत नसेल तर कायदा आणि त्याचा उद्देश काय ते समजून घ्यायचा.

 

WhatsApp channel