Aditya Thackeray : महायुतीचे सरकार केवळ ६ ते ७ महीने! महाविकास आघाडी सरकार लवकरच सत्तेत येणार; आदित्य ठाकरे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aditya Thackeray : महायुतीचे सरकार केवळ ६ ते ७ महीने! महाविकास आघाडी सरकार लवकरच सत्तेत येणार; आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : महायुतीचे सरकार केवळ ६ ते ७ महीने! महाविकास आघाडी सरकार लवकरच सत्तेत येणार; आदित्य ठाकरे

Jun 18, 2024 07:30 AM IST

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आणि राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली आहे. तसेच पुढील काही महीने हे सरकार सत्तेत राहणार असून त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

महायुतीचे सरकार केवळ ६ ते ७ महीने! लवकरच सत्तेत येणार महाविकास आघाडी सरकार; आदित्य ठाकरे
महायुतीचे सरकार केवळ ६ ते ७ महीने! लवकरच सत्तेत येणार महाविकास आघाडी सरकार; आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केले आहे. हे सरकार केवळ सहा महीने टिकणार असून नोव्हेंबर महिन्यात पुन्हा महावीकास आघाडीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. ही निवडणूक आपण जिंकणार ही खात्री असून ही निवडणूक नांदी ठरणार आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देखील हेच वातावरण राहणार असून आपल्याला पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार बसवायचचं आहे, त्यामुळे आतापासूनच आपल्याला कामाला लागायचे आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई येथील एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी वरील विधान केले. आदित्य ठाकरे म्हणाले, मिंद्ये सरकारने मोठा घोळ केला आहे. त्यामुळे ज्यांना-ज्यांना वाटतंय ते आता बाहेर पडतील. महाराष्ट्रप्रेमी व अनेक खासदार देखील त्यांच्या सत्तेतून बाहेर पडतील. भाजपचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो, स्पीकर तुमचा बनवा, जर भाजपचा स्पीकर झाल्यास पहिला ते तुमचा पक्ष फोडतील.

आदित्य ठाकरे म्हणले, हे सरकार केवळ ६ महीने सत्तेत राहणार आहे. राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील. मात्र, असे असले तरी जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा सामावून घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष असून येत्या काळात आमच्या आमदारांची संख्या जास्तीत जास्त राहील असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.

हुकूमशाहीचा बीमोड महाराष्ट्राने केला

महाराष्ट्राने नेहमी हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध केला आहे. लोकसभेत मतदारांनी दिलेल्या कौलावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राने दाखवले मस्ती, हुकूमशाही चालणार नाही. भाजपवाले छाती फुलवतात, ती टाचणीने फोडता येते. अमोल कीर्तीकर यांची निवडणूक बघा, भाजपने यंत्रणेचा गैरवापर केला. भाजपला सिंगल पार्टी रूल आणायचे आहे. देशातील संविधान भाजला बदलायचे आहे. या बाबत पंकजा मुंडे यांनी देखील विधान केले होते. जर ४०० पार जागा निवडून आल्या तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. पण याचं संविधानाने केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवली आहे. या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे.

Whats_app_banner