New Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा

New Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा

Dec 31, 2024 07:21 AM IST

New Year Celebration : आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार सेलिब्रेशन केले जाणार आहे. हे सेलिब्रेशन गडकिल्ले टेकड्यांवर केल्यास थेट कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे.

गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा
गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा

New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला गडकिल्ले, अभयारण्ये, आणि शहरातील टेकड्यांवर 'सेलिब्रेशन' करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्ट्या करण्याची मानसिकता लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, वन कर्मचारी रात्रभर गस्त घालणार आहेत.

आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार सेलिब्रेशन केले जाणार आहे. हे सेलिब्रेशन गडकिल्ले टेकड्यांवर केल्यास थेट कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे. नवीन वर्षाचे स्वागत गडकिल्ले, अभयारण्ये किंवा शहरातील टेकड्यांवर जाऊन करायची अनेकांची इच्छा असते. मात्र, याला वन विभागाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचे स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वन विभगाने स्पष्ट केलं आहे.

वनविभागाचा चोख बंदोबस्त

दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्टी करण्याची मानसिकता असते. हे लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रात्रभर वन कर्मचारी गस्त घालणार आहेत. या साठी स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्ते त्यांना मदत करणार आहेत. वन विभागाचे कर्मचारी ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांसह मंगळवारी (दि. ३१) रात्री गस्त घालणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील रिसॉर्ट फुल्ल

शहरालगत असलेले ग्रामीण भागातील रिसॉर्ट ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी फुल्ल झाले आहेत. शहरातील हॉटेलमध्ये होणारी गर्दी वाहतूक कोंडी नियमाचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई यापासून वाचण्यासाठी नागरिकांची रिसॉर्टला पसंती देण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी शहरात जवळील फार्म हाऊस खाजगी बंगल्यामध्ये पार्ट्याचे आयोजन केले आहे डोणजे, खडकवासला ,पानशेत, वेल्हे ,मुळशी, ताम्हिणी लोणावळ्यातील रिसॉर्ट फार्म हाऊस ,कॅम्पिंग सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरला दुपारी ते बुधवारी संध्याकाळपर्यंत शहरालगतची शांत निसर्गरम्य रिसॉर्ट बुकिंग पूर्ण झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर