मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Rape Case : लव्ह, सेक्स अन् धोका; नागपुरच्या अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार
Nagpur Rape Case News
Nagpur Rape Case News (HT_PRINT)

Nagpur Rape Case : लव्ह, सेक्स अन् धोका; नागपुरच्या अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार

14 March 2023, 19:37 ISTAtik Sikandar Shaikh

Nagpur Crime News Marathi : पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवरून यूपीतील तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर तरुणानं नागपुरात खोली भाड्यानं घेत आक्षेपार्ह कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

Nagpur Rape Case News : इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील बेलतरोडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्काराच्या गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपी तरुण हा उत्तर प्रदेशातील असून काही दिवसांपूर्वीच त्याची नागपुरातील तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीनं उत्तर प्रदेशातून थेट नागपूर गाठत तरुणीशी शारिरीक संबंध प्रस्तापित केले, तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं घरगुती उपायांनी तिला गर्भपात करायला लावल्याचंही तपासातून समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवरून उत्तर प्रदेशातील साहिल सरकानिया याच्याशी ओळख झाली होती. आरोपीनं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तो कामाच्या निमित्तानं थेट नागपुरात आला. त्यानंतर तरुणीच्या घराशेजारी खोली भाड्यानं घेत तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला. तरुणी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनं घरगुती उपायांनी तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केलं. परंतु तरुणीची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला आहे.

पीडितेच्या आजीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीचं वय केवळ १७ वर्ष इतकं असून ती अकरावीत आहे, गेल्या काही वर्षांपासून ती आजीसोबत राहत आहे. इन्स्टाग्रामवरून आरोपीशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.