मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhandara Crime News : क्षुल्लक वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; धक्कादायक घटनेने भंडारा हादरलं

Bhandara Crime News : क्षुल्लक वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; धक्कादायक घटनेने भंडारा हादरलं

Aug 22, 2023 02:47 PM IST

Bhandara Crime News : काही दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. सूडाने पेटलेल्या आरोपीने अभिषेकला कायमचं संपवल्याची घटना समोर आली आहे.

Bhandara Crime News Marathi
Bhandara Crime News Marathi (HT)

Bhandara Crime News Marathi : नागपुरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता भंडारा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून आरोपी शहरातील उच्चशिक्षित तरुणाची हत्या केली आहे. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर या गावात ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. अभिषेक कटकवार असं मृत तरुणाचं नाव असून तो गणेशपूर या गावातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता या धक्कादायक घटनेमुळं भंडाऱ्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरानजीक असलेल्या गणेशपूर या गावात राहणाऱ्या अभिषेक कटकवार या तरुणाचे आरोपीशी काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती. परंतु वाद मिटला होता. आरोपीने अभिषेकवर नजर ठेवून सूडभावनेने त्याला संपवण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अभिषेक सामान्य रुग्णालयातून बाहेर पडत असतानाच आरोपीने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर आरोपीने अभिषेकची दगडाने ठेचून हत्या केली. तरुणाची हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

गणेशपूर भागात तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. गणेशपूर भागात तरुणाची हत्या करत पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४