Pune Kharadi accident: पुण्यात रॅश ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच! खराडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील २ विद्यार्थ्यांना चिरडले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Kharadi accident: पुण्यात रॅश ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच! खराडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील २ विद्यार्थ्यांना चिरडले

Pune Kharadi accident: पुण्यात रॅश ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच! खराडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीवरील २ विद्यार्थ्यांना चिरडले

May 28, 2024 10:10 AM IST

Pune Kharadi accident : पुण्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. कल्याणी नगर येथील अपघाताची घटना ताजी असतांना एका भरधाव ट्रकने सोमवारी मध्यरात्री दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

भरधाव ट्रकने सोमवारी मध्यरात्री दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
भरधाव ट्रकने सोमवारी मध्यरात्री दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

Pune Kharadi accident : पुण्यात रॅश ड्रायव्हींगचे सत्र सुरूच आहे. काल रात्री देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. कल्याणी नगर येथील पोर्शे कारचा अपघात ताजा असताना खराडी येथे एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली असून या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

Palghar Accident : पालघरमध्ये टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात! तिघे ठार, ७ गंभीर जखमी! नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला

आदील शेख व पाहद शेख (दोघेही राहणार लातूर) अशी ट्रकने दीलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यातील आदिलचा जागीच मृत्यू झाला तर तर पाहदचा मृत्यू ससून रुग्णालयात उपचार सुरू असतांना झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर रस्त्यावरील जकातनाका येथे ही घटना घडली. आदिल आणि पाहद हे त्याचा मित्र अफांन शेख यांना गावी जायचे असल्याने त्याला सोडण्यासाठी ते पुणे स्टेशनला जात होते. यावेळी नगर रस्त्यावरील जकात नाका येथे एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की दुचाकी ही ८०० मीटर फरफटत गेली. दरम्यान, ट्रक चालकाने मद्य प्राशन केल्याचे देखील उघड झाले आहे.

Maharashtra Weather Update : सूर्य ओकतोय आग! अकोला, चंद्रपूर, यवतमाळला हीट वेव्ह तर उर्वरित राज्यात पावसाची शक्यता

पुण्यातील खराडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यात ट्रक चालकांची संख्या मोठी असते. यातील एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने काल रात्री झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा नाहक बळी घेतला आहे.

गेल्या आठवड्यात १९ मे रोजी कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री एका बिल्डरच्या मुलाने आलीशान पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना धडक दिली होती. यात दोन इंजिनिअर तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणी आता पर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातानंतर काही स्थानिक नागरिकांनी या ट्रकच्या काचा फोडल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर