मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात पुन्हा हीट अँड रन! आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; पुणे नाशिक मार्गावरील घटना

Pune Accident : पुण्यात पुन्हा हीट अँड रन! आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; पुणे नाशिक मार्गावरील घटना

Jun 23, 2024 08:51 AM IST

Pune Accident : पुण्यात पुन्हा हीट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले असून यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना पुणे नाशिक मार्गावर रात्री घडली.

पुण्यात पुन्हा हीट अँड रन! आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; पुणे नाशिक मार्गवरील घटना
पुण्यात पुन्हा हीट अँड रन! आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं; पुणे नाशिक मार्गवरील घटना

Pune Accident : पुण्यात हीट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. खेड तालुक्यात आळंदी येथे एका महिलेला रागातून एकाने उडवल्याची घटना ताजी असतांना आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले. ही घटना पुणे नाशिक मार्गावर रविवारी मध्यरात्री  मंचर जवळील कळंब येथे घडली. यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दूसरा व्यक्ति हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार पुतण्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण ताजे असतांना पुणे जिल्ह्यातील आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. ओम सुनिल भालेराव असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नव आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मयूर मोहिते असे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटाचे खेड तालुक्यातील आमदार आहेत. त्यांचा पुतण्या मयूर मोहिते हा पुणे नाशिक मार्गाने मध्यरात्री येत असतांना त्याने कळंब जवळ दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले. यात एकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्या मयूर मोहिते पाटील यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मयूर याने अपघातावेळी मद्य प्राशन केले होते का याचा तपास देखील पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या हा पुणे नाशिक मार्गाने भरधाव वेगात येत होता. यावेळी मंचर जवळील कळंब येथे दुचाकीवरून जाणाऱ्या ओम भालेराव व त्याच्या आणखी एका मित्राला मयूर मोहिते याच्या गाडीने उडवले. या घटनेत ओम भालेराव (वय १९) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

आमदार पुतण्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवत होता गाडी

या अपघात प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याला येत होता. यावेळी विरुद्ध दिशेने त्याने वेगाने गाडी दामटली असल्याची माहिती आहे. यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या कारने धडक दिली. यात ओम भालेराव याचा जागीच मृत्यू झाला. तर दूसरा दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आमदार पुतण्यावर कारवाई होणार का ?

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. दरम्यान, आता या प्रकरणात देखील गाडी चालवणारा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेले दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मयूर मोहितेवर कारवाई होणार का असा प्रश्न स्थानिक उपस्थित केला आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर