मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune navale bridge accident : पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन ट्रकची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

Pune navale bridge accident : पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोन ट्रकची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2024 03:26 PM IST

Pune navale bridge accident : पुण्यातील नवले पूल येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात दोघे जखमी झाले.

Pune navle bridge accident
Pune navle bridge accident

Pune navle bridge accident : पुण्यातील नवले पूल येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला. यात दोघे जण जखमी झाले आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या दोन जखमींना बाहेर कडून त्यांना दवाखान्यात भरती केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

न्याय यात्रेत आसाममध्ये पुन्हा राडा! गुवाहाटीत जाण्यापासून रोखले; पोलिसांच्या लाठीहल्ल्यात काँग्रेस कार्यकर्ते जखमी

अग्निशमन अधिकारी प्रभाकर उमरतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रजहून वारजेकडे जात असताना नवले पुलाखाली हा अपघात झाला. ही घटना पहाटे ४ वाजता घडली. एक ट्रक भरधाव वेगात जात असतांना त्याने पाठीमागून दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रकचा केबिनचा भागाचा चक्काचूर झाला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत ट्रकचा चालक आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघेही त्यात अडकून पडले होते.

मुंबई लोकलने तीन जणांना चिरडले; सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करताना घडली घटना

उमरतकर म्हणाले, या अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी आलो. ट्रक चालक व त्याचा साथीदार दोघेही ट्रकमध्ये जखमी अवस्थेत अडकले होते. पुणे महानगर पालिका आणि पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ दोघांना बाहेर काढत दवाखान्यात भरती केले आहे. ट्रक चलकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अर्ध्या तासात पीएमसी आणि पीएमआरडीए अग्निशमन अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून येथील वाहतूक सुरुळीत केली.

WhatsApp channel