miraj accident news : सांगलीत मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, ४ ऊसतोड मजूर ठार; १० जण गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  miraj accident news : सांगलीत मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, ४ ऊसतोड मजूर ठार; १० जण गंभीर

miraj accident news : सांगलीत मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, ४ ऊसतोड मजूर ठार; १० जण गंभीर

Updated Apr 02, 2024 11:06 AM IST

Miraj Accident News: सांगलीत मिरज सोलापूर मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या घटनेत चार उसतोड मजुरांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत.

सांगिलीत मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, ४ ऊसतोड मजूर ठार; १० जण गंभीर
सांगिलीत मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, ४ ऊसतोड मजूर ठार; १० जण गंभीर

Sangli Miraj-Solapur road Accident : सांगलीत भीषण अपघात झाला आहे. मिरज सोलापूर मार्गावर उसतोड मजुरांना ट्रकने चिरडले असून या घटनेत ४ उसतोड कामगारांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहे. सर्व मजूर हे ऊसतोडणीचे काम संपवून घरी परत जात होते. मात्र, घरी जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या ट्रॅकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे चिक्कलगी शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे.

April bank holidays : लवकरात लवकर आटपून घ्या महत्त्वाचे व्यवहार! एप्रिल महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद

शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३०, रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३ , रा. चिक्कलगी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर १० जखमी असून त्यांची नवे समजू शकली नाही.  कवठेमहांकाळ व  मिरज  येथील दवाखान्यात त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.  

varandha ghat : वरंधा घाट दुरुस्तीसाठी भोर-महाड रस्ता दोन महिने राहणार बंद; एसटी बसच्या फेऱ्या रद्द

मिळालेल्या माहितीनुसार ही घटनामध्यरात्री २ च्या सुमारास नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ घडली. अपघातातील मृत आणि जखमी हे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातिल रहिवासी आहे. हे सर्वजण रोजगाराचे साधन नसल्यामुळे ऊस तोडणी करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आले होते. काही ऊसतोड मजूर हे शिरोळ येथील गुरुदत्त सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. येथील गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परत जात होते. यावेळी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला.

त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आंध्रप्रदेशातील एका मालवाहू ट्रकने त्यांच्या ट्रॅकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात निलाबाई परशुराम ऐवळे, शालन दत्तात्रय खांडेकर, आप्पा ऐवळे, जगमा तम्मा हेगडे यांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमधील तीनजण चिखलगीचे आहेत.  एकजण शिरनांदगीचा रहिवासी आहे. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व  मिरज येथील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर