Washim Accident : वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कारंजा पोहा मार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकले असून या विचित्र अपघातात तिघे जण ठार झाले आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान, झाला. आपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा पोहा मार्गावर तुळजापूर धरणाजवळ हा अपघात मध्यरात्री झाला. यात तीन वाहने एकमेकांना धडकली. पिकअप व प्रवासी ऑटो व आणखी एक रिक्षा ही तीन वाहने एकमेकांना धडकली. या घटनेत १ महिला व २ पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. ऑटोमधील प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त जण बसले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमीवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी जखमींना दवाखान्यात भरती केले. स्थानिक नागरिकांनी देखील बचावकार्यात सहभाग घेतला. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाशी ऑटोला समोरून धडक दिली. यावेळी ऑटोच्या मागून मालवाहतूक करणारा छोटा टेम्पो देखील होता. पिकअपची ऑटोलाही धडक बसली व ऑटो हा टेम्पोला धडकला. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तर ३ तिघे ठार झाले आहे.
मंगळवारी रात्री मध्यरात्री हा अपघात झाला. कारंजा -पोहा मार्गावर एक रिक्षा प्रवाशांना घेऊन विरुद्ध दिशेने जात होता. यावेळी समोरून वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या ऑटोला धडक दिली. यावेळी रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक टेम्पो येत होता. या टेम्पोवर रिक्षा जाऊन आदळली. या तीन वाहनांच्या भीषण अपघातात तिघे ठार झाले. यात महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. रिक्षातील ९ प्रवसी गंभीर जखमी झाले. अपघाताच होताच स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाशांना दवाखान्यात भरती केले. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जखमी व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची नावे समजू शकली नाही.
संबंधित बातम्या