मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल; दुचाकीनं जाणाऱ्या दोघांना चिरडलं!

Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल; दुचाकीनं जाणाऱ्या दोघांना चिरडलं!

Jun 24, 2024 12:29 PM IST

Container and Bike Accident On Mumbai- Nashik Highway: मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक
मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक

Container Collided Bike : मुंबई- नाशिक महामार्गावर कंटनेर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला. याप्रकरणी पोलिसांनी कंटनेर चालकाला अटक केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमान सय्यद (वय, १९) आणि अर्चना पगारे (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. अमान आणि अर्चना हे दोघेही ठाणे आणि डोंबिवलीमध्ये नोकरी करायचे. शनिवारी दोघेही कामावरून घरी परतत असताना खारेगाव टोल जवळ भरधाव कंटनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरमधील लोखंडी रॉड त्यांच्या शरीरात घुसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक जितेंद्रकुमार यादव (वय, २८) याला अटक केली. तसेच हा अपघात कशामुळे झाला? त्यामागचे खरे कारणही शोधले जात आहे. याशिवाय, कंटेनर चालकाने मद्यपान केले होते का? याचाही तपास सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे: आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले

पुणे- नाशिक महामार्गावर एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना चिडरल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडले. नाशिक पुणे जुना महामार्ग रोडवर मयूर मोहिते पाटील याने कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर मयूर मोहिते पाटील याने मदत न करता तिथून पळून गेला. मयूर मोहितेने मद्य प्राशन केले होते की नाही? याचा तपासही पोलीस करत आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरण ताजे असताना एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांचा कारखाली चिरडल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर