Mumbai Accident News: पुण्यात अल्पवयीन मुलाने दोन जणांना चिरडल्याचे घटना ताजी असताना मुंबईत अल्पवयीन चालकाने दिलेल्या एका जणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जे.जे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. तर, आरोपीची रवानगी बालगृहात करण्यात आली. मुंबईच्या माझगाव पुलावर हा अपघात झाला. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान खान (वय, ३२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इरफान खान हा गारमेंटचे काम करायचा. गुरुवारी सकाळी तो दुचाकीवरून माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट ब्रिजवरून जे.जे रोडच्या दिशेने जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्याला धडक दिली. या अपघातात इरफान खानचा मृत्यू झाला. या अपघातील कार चालक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालगृहात करण्यात असून त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईत अल्पवयीन चालकाच्या धडकेत एका तरुणाला जीव गमवावा लागला.
पोर्शे टायकन कारने मोटारसायकलला धडक दिल्याने मध्य प्रदेशातील दोन तंत्रज्ञांचा मृत्यू झालेल्या १७ वर्षीय मुलाच्या आजोबांची पुणे पोलिसांनी गुरुवारी चौकशी केली. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी कारची फॉरेन्सिक तपासणीही केली. पोर्श कारने तरुणाच्या घरापासून ते कोसी रेस्टॉरंट, ब्लॅक क्लब आणि अपघातस्थळापर्यंत च्या संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या महागड्या कारचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी जीपीएसमधील डेटा आणि वाहनाच्या आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या फुटेजसह तांत्रिक पुरावे गोळा केले.
येरवडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या या कारची पथकाने आज तपासणी केली. आम्ही घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी केली असून आता कारचीही तपासणी करण्यात आली आहे. जीपीएस, गाडीच्या आजूबाजूचे कॅमेरे अशा तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पुण्यातील कल्याणी नगर भागात हा अपघात घडला, त्यावेळी पोलिसांनी कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या तरुणाच्या एका मित्राची आणि त्याच्या ड्रायव्हरची चौकशी केली. आजोबांची चौकशी करण्यात आली. कारण ते पोर्श कारची मालकी असलेल्या रिअल्टी फर्मचे मालक आहेत. या घटनेची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या मित्राची चौकशी करण्यात आली.