मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Accident News: ठाण्यात ट्रकला ओव्हरटेक करताना माजी सैनिकाचा मृत्यू

Thane Accident News: ठाण्यात ट्रकला ओव्हरटेक करताना माजी सैनिकाचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 31, 2024 03:38 PM IST

Thane Bike Accident: ठाण्यात ट्रकला ओव्हरटेक करताना माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यात ट्रकच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात ट्रकच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे.

Ex-Serviceman Dies By Road Accident: ठाण्यात शनिवारी संध्याकाळी ट्रकच्या चाकाखाली येऊन माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. ट्रकला ओव्हरटेक करताना माजी सैनिक यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मोतीलाल रामदास शिरसाट, असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकांचे नाव असून ते डोंबिवली येथील ठाकुर्ली परिसरात राहायला होते. शिरसाट हे शनिवारी संध्याकाळी कळवा नाक्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला आहे. परिसरातील नागरिकांनी ठाणे नगर पोलिसांना या अपघाताबद्दल माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पुढील प्रक्रियासाठी शिरसाठ यांचे मृतदेह ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.

शिरसाठ यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, असे पोलिसांनी सांगितले. ठाणे नगर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी तुकाराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाठ हे ठाकुर्ली येथे दोन मुले आणि पत्नीसह राहत होते आणि ठाण्यातील एका सिक्युरिटी कंपनीत नोकरी करत होते. ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

Badlapur: उकळत्या पाण्यात मिरची पावडर मिसळून मुलाच्या अंगावर ओतलं; बदलापूर येथील घटना

याप्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवत आहेत. पंचनामा करण्यात आला असून ठाणे नगर पोलिसांनी ट्रकचालकावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

पुणे: चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुण्यात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडला. पुण्यातील नवले पुलाकडून वडगाव पुलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील श्री मंगलम ग्रेनाईट समोर हा अपघात झाला.पार्थ गिरिष शहा (वय, २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग