Nandurbar Accident: धावत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील चौघांना उडवलं!-accident man heart attack while driving in nandurbar 2 dead in accident ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nandurbar Accident: धावत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील चौघांना उडवलं!

Nandurbar Accident: धावत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील चौघांना उडवलं!

Aug 18, 2024 05:04 PM IST

Nandurbar Accident News Today: नंदुरबारमध्ये धावत्या कारमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मोठा अपघात घडला.

नंदुरबारमध्ये कारला अपघात, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
नंदुरबारमध्ये कारला अपघात, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Nandurbar News: नंदुरबारमध्ये आज विचित्र अपघात घडला. धावत्या कारमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यावरील चौघांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार गुजरातमधील आहे. नंदुरबारजवळून जात असताना कारचालकाला कारमध्येच जोरदार हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील चार जणांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, रस्त्यावरून पायी जाणारे एक महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. परंतु, मृतांमध्ये कारचालक आणि एका ६० वर्षीय भंगार विक्रेत्याचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रक- कारमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३ जखमी

समृद्धी महामार्गावर गुरुवारी ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात घडला. भरधाव कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात हा अपघात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२.०० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ येथून जात असताना अपघातग्रस्त ट्रक बंद पडला. यानंतर भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या कारमध्ये एकूण पाच जण होते. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर, ३ जण जखमी झाले.या घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवले.

विभाग