मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident In Melghat : मेळघाटात भीषण अपघात! भरधाव जीप दीडशे फुट खोल दरीत कोसळला; चार ठार

Accident In Melghat : मेळघाटात भीषण अपघात! भरधाव जीप दीडशे फुट खोल दरीत कोसळला; चार ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 04, 2022 12:18 AM IST

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरात एक भीषण अपघात झाला. एक चारचाकी ही भरधाव वेगात येत दीडशे फुट दरीत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला.

अपघात
अपघात

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागात भाजीपाला विक्रीसाठी नेणारे वाहन भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राणीगावा जवळील दीडशे फूट दरीत कोसळले. या भीषण अपघातात जवपास ४ ठार तर ८ गंभीर जखमी झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत चालक केशव शिवाजी बनसोड (रा. अडगाव), सय्यद समशेर (रा. अकोट) यांचा मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा दवाखान्यात नेत असतांना मृत्यू झाला. त्यांची नावे समजू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आघातात शरीफ खान, सरदार खान रेडिमेड वाले (३८), जरीफ खान शब्बीर खान चाबीवाले (३२), प्रफुल हरोडे ऊर्फ पिंटू (५०), समीर बेग अकबर बेग (३५), श्रीकृष्ण श्यामराव कोथडकर (४७), सय्यद जाफर (४०, सर्व रा. अकोट व हिवरखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे बुधवारी मोठा आठवडे बाजार भरतो. हा बाजार मोठा असल्याने या ठिकाणी काही शेतकरी हे आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. अकोट हिवरखेड येथील काही शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल हा विक्रीसाठी आणला होता. बाजारातील व्यवहार पूर्ण झाल्यावर संध्याकाळच्या सुमारास परत जात होते. यावेळी राणीगावनंतर असलेल्या जंगलातील घाटवळणाच्या उतार रस्त्यावर या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन एका झाडाला धडकुन दरीत कोसळले. यानंतर हे वाहन उसळून थेट एका झाडाला जाऊन अडकले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात नेट असतांना मृत्यू झाला.

धारणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुरेन्द्र बेलखडे म्हणाले, अपघातात दोन मृतांची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी रवाना झाले आहेत. साधारणत: ७ ते ९ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.

IPL_Entry_Point